A. P. J. Abdul Kalam : Abdul Kalam Books in Marathi

90.00

Description

Price: ₹ 90.00
(as of Dec 17,2020 22:20:05 UTC – Details)

jPjiA4C

दक्षिण भारतातील रामेश्वरम्जवळील एका खेड्यातील गरीब मुलगा. वडील नावाडी. मुलाला शिकावं वाटतं. प्रयत्न आणि जिद्दीनं तो आत्मविश्वासाने शिकतो. परमेश्वराबद्दल त्याला नितांत आदर असतो. शिक्षणामुळे त्या मुलाच्या जीवनाचे सोने होते आणि हा खेड्यातील पोरगा भारताचा राष्ट्रपती बनतो. असा आहे चित्तथरारक प्रगतीचा प्रवास अब्दुल कलामांचा. भारतही उपलब्ध तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने जगात उभा राहू शकतो, हे कलामांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न ते भारतीय तेजस्वी मुलांत शोधतात. एका सामान्य मुलाने शिक्षण आणि प्रयत्नाने घेतलेली ही उत्तुंग झेप अंधारातून सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारी आहे. अब्दुल कलामांची ही चरित्र कहाणी लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीने शंकर कहाडे यांनी सांगितली आहे. शंकर कहाडे हे आजचे मराठीतील मुलांसाठी चरित्र लेखन करणारे महत्त्वाचे लेखक आहेत.From the Publisher

A. P. J. Abdul Kalam by Shankar Karhade

A. P. J. Abdul KalamA. P. J. Abdul Kalam

थोर पुरुष हेच आज मुलांसमोर आदर्श आहेत. त्यांच्या गोष्टीरूप चरित्रातून चांगले आदर्श मुलांसमोर उभे करावे हाच या गोष्टीरूप चरित्रमालेचा उद्देश आहे.

15 ऑक्टोबर, 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्मलेले डॉ. अब्दुल कलाम म्हणजे भारताला मिळालेली एक देणगीच होय. बालपणापासूनच त्यांनी उंच भरारी घेण्याचे स्वप्नं उराशी बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी व देशाच्या विकासासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्यरत राहिले. भारतीय राजकारण, समाजकारण, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्या-ज्या व्यक्तींनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला त्यात डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव उच्च स्थानावर आहे.

डॉ. अब्दुल कलाम कधीच निवृत्त झाले नाहीत, एक काम संपले की, लगेच दुसरे काम हातात घेत. सतत कार्यरत राहणार्‍या, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदान करणार्‍या डॉ. अब्दुल कलाम यांचे शिलाँग येथे व्याख्यान देत असताना निधन झाले. तो दिवस होता 27 जुलै, 2015.

भारत 2020 पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात रुजवणारा हा महान वैज्ञानिक देशाने गमावला.

माझ्या मृत्यूनंतर कोणीही आपले काम थांबवू नये, असे म्हणणार्‍या डॉ. अब्दुल कलामांचे नाव भारताच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. खरंच, असा मिसाइल मॅन पुन्हा होणे नाही. अशा या प्रेरणादायी व लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाला सलाम!

– प्रस्तुत पुस्तकातून

दक्षिण भारतातील रामेश्वम्जवळील एका खेड्यातील गरीब मुलगा. वडील नावाडी. मुलाला शिकावं वाटतं. प्रयत्न आणि जिद्दीनं तो आत्मविश्वासाने शिकतो. परमेश्वराबद्दल त्याला नितांत आदर असतो.

शिक्षणामुळे त्या मुलाच्या जीवनाचे सोने होते आणि हा खेड्यातील पोरगा भारताला राष्ट्रपती बनतो.

असा आहे चित्तथरारक प्रगतीचा प्रवास अब्दुल कलामांचा.

भारतही उपलब्ध तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने जगात उभा राहू शकतो, हे कलामांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न ते भारतीय तेजस्वी मुलांत शोधतात.

एका सामान्य मुलाने शिक्षण आणि प्रयत्नाने घेतलेली ही उत्तुंग झेप अंधारातून सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारी आहे.

अब्दुल कलामांची ही चरित्र कहाणी लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीने शंकर कर्‍हाडे यांनी सांगितली आहे. शंकर कर्‍हाडे हे आजचे मराठीतील मुलांसाठी चरित्र लेखन करणारे महत्त्वाचे लेखक आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “A. P. J. Abdul Kalam : Abdul Kalam Books in Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *